https://www.google.com/adsense/new/u/0/pub-4475133060821869/sites/detail/url=bkilche.blogspot.com चौफेर : July 2021
animated-fireworks-image-0061 animated-rose-image-0045चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे animated-rose-image-0045 मी कोणाला शिकवत नाही मी फक्त ते शिकू शकतील असे वातावरण देतो” - अल्बर्ट आईन्स्टाईन 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐💐💐💐 animated-bird-image-0155 -image-1310" />

Sunday, July 25, 2021

मी पणाच्या विश्वातून सत्याची वाटचाल…

 


मी पणाच्या विश्वातून सत्याची वाटचाल…

 

केवळ आणि केवळ समाज माध्यमावर सत्यपणाचे धडे द्यायचे,  पण व्यवहार आणि कृती करताना समाज माध्यमावरचा  सत्यपणाचा बुरखा बदलणारी नवी पिढी उदयास आल्यामुळे समाज माध्यमांचा काळात सत्यपणाचे मुखवटे हे कधीच गळून पडलेले आहेत. त्यामुळे मानवी स्वभावाची चर्चा होणे स्वाभाविक आहे.  त्यातूनच हाँब्ज मानवी स्वभावाचे वर्णन करताना निसर्ग अवस्थेतील मनुष्य स्वार्थी व अत्यंत गर्विष्ठ होता तसाच तो क्रुर व रक्तपिपासू होता असे म्हणतो. कारण या काळातील जी काही निसर्ग अवस्था होती त्यात स्पर्धा, परस्परांबद्दल अविश्वास व यश ही मानवी संघर्षाची मुलभूत कारणे त्यांनी मांडलेली आहेत.तर लाँक मानवी स्वभावाविषयी म्हणतो, मानवी मन जन्मतः हे कोरी पाटी असते. परंतु अनुभव हाच  त्यांच्या ज्ञानाचा आधार राहिल्यामुळे अनुभवाचे ठसे त्याच्या मन स्मृतीवर उमटतात. एकंदरीतच हे अनुभवाचे ठसे चांगली किंवा वाईट ही असू शकतात. तरीही निसर्ग अवस्थेतील माणूस हा नैतिक जीवन जगणारा विवेकी आणि सामाजिक प्राणी आहे. तो स्वार्थी व आक्रमक प्रवृत्तीचा नसतो तर त्याच्यामध्ये सहानुभूती प्रेम आणि सामाजिक न्याय भावना ही ठासून भरलेली असते आणि समाजात वावरताना तो सामाजिक बांधिलकीचे तत्व स्वीकारतो. म्हणजेच  हाँब्ज आणि लाँक हे मानवी स्वभावाचे परस्पर दोन्ही टोक याठिकाणी दाखवताना दिसतात. त्यामुळे त्यांनी मानवी स्वभावाचे  जे वर्णन केले आहे ते वर्णनेने आज तंतोतंत लागू पडत आसल्याचे दिसून येते. 

     त्यामुळे मानवी स्वभावाचा  विचार करता आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात दोन्ही विचारधारेचे लोक जीवन जगताना दिसतात.त्यातूनच इतरांना खुश ठेवण्यासाठी आज होयबा ही संस्कृती मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे आणि त्यामुळे आज कोणत्याही  घटनेला,विधानाला आपण कधीही नाही म्हणत नाही,कारण होयबा संस्कृतीमध्ये स्वार्थ दबलेला असतो आणि त्या स्वार्थापोटी समोरची व्यक्ती कधीही समोरच्याला त्याची कृती खोटी जरी असली तरी ही नाही म्हणण्याची हिम्मत तो करत नाही. त्यातुनच  एखाद्या समोरच्या व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीची दखल घेण्याची गरज नसतानाही, आपण कधी तरी त्याची दखल घेतो आणि त्या दखल पोटी आपण त्यांना त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या वेळी त्यांच्या भावना नक्कीच दुखावतात आणि त्यातुनच समोरच्या व्यक्तीने दाखवलेली चूकीच्या संदर्भात बदल्याची भूमिका समोर ठेऊन त्यांच्याशी खुणस द्यायची ही संस्कृती काल ही होती आणि आज ही आहे.म्हणून आपण भले आणि आपले काम भले हा विचार पुढे आला.म्हणूनच आज जो तो आपलं बघेल ही संस्कृती मोठ्या प्रमाणात रूजली आहे. त्यामुळे इतरांच्या वर्तनात कोणी हस्तक्षेप करण्यास धजावत नाही.

     पण ह्या गोष्टीमुळे आपण इतरांपेक्षा वेगळे  आहोत ही भावना समोरच्याच्या मनात दृढ होत असते.वास्तविक पाहता शोषण करणे हीच संस्कृती जोपसण्यातच हे लोक धन्य मानतात.त्यातून आपण ज्या पध्दतीने आपले व्यक्तिमत्त्व  विकसित केले आहे, तोच  धागा  पकडून इतरांच्या व्यक्तिमत्वाला ही आपल्याच व्यक्तिमत्त्वा सारखे समजण्याची एक वृत्ती त्यांच्यामध्ये रुजलेली असते. म्हणूनच अशा लोकांना आपल्या क्षेत्रातील सर्वोच्च पद मिळवण्याची अघोरी भूक ही त्यांची काही कमी होत नाही. त्यामुळे त्या सर्वोच्च पदासाठी कोणत्याही थराला जाण्याची संस्कृती अशा लोकांनी रुजवलेली आहे.त्यातुनच काही लोक सर्वोच्च पदावर जाऊन बसतात  आणि त्याच सर्वोच्च पदावरून इतर लोक कसे चापलुसी करतात आणि आम्ही कसे कर्तुत्वाने पुढे आलेले आहोत हे ही दाखवण्यास हे लोक विसरत नाहीत. त्यामुळे इतरांची चापलुसी करून सर्वोच्च पद मिळाल्यामुळे इतरही लोक चापलूसीगीर आहेत अशी मानसिकता त्यांची बनते.म्हणजे एखाद्याने पिवळा चष्मा लावला आसल्याने समोरच्या व्यक्तीस ही कावीळ झाल्याचा भास  त्या व्यक्तीस होतच असतो. त्यामुळेच मुळातच अशा लोकांशी संवाद शैली हे अत्यंत प्रभावी असते आणि त्या संवादशैलीच्या आधारावर इतरांना मोहित करण्याचं काम ते मोठ्या शिफसतिने करतात. मुळातच ह्या लोकांची भूमिका ही चोरांची असते म्हणजेच ज्याप्रमाणे मांजर दूध पिते त्याप्रमाणे मांजरीला वाटते की मला कोणी बघत नाही त्याच पद्धतीने या लोकांचे वर्तन असताना ही इतरांना तुच्छ माणण्यातच ही जमात अत्यंत प्रगल्भ झालेली असते.मुळात चापलुसगिरीच्या जोरावर पुढे आलेल्या ह्या जमातीला कोणतीही स्पर्धा नको असते, त्यांच्याशी स्पर्धा करणारायांच्या संदर्भात त्यांच्या मनात चीड निर्माण झालेली असते.म्हणूनच अशी जमात आपल्यासोबत एक चांडाळ चौकडी ठेवत असते आणि त्या चांडाळ चौकडीच्या करामतीच्या जोरावर अधिराज्य गाजविण्याचे काम ही जमात करताना आपल्याला दिसून येते. मुळात ही जमात चांडाळ चौकडी मध्ये अडकल्यामुळे ज्याप्रमाणे घोड्याच्या डोळ्याच्या दोन्ही बाजूला झापडया लावलेल्या असतात आणि त्या झापडयामुळे घोडा ज्याप्रमाणे एका सरळ रेषेत चालतो त्याच पद्धतीनं हे लोक सुद्धा एकाच सरळ रेषेत चालतात त्यांना इतरत्र काय घडतं याचे काही घेणंदेणं नसते आणि हीच जमात मात्र इतरांना सत्यवचनाचे धडे देताना दिसून येते. मुळातच संकुचित वृत्तीचा दृष्टीकोन असणारी ही जमात मात्र इतरांना व्यापक दृष्टिकोन कसा असावा याचे धडे देतात.

       बरे ही जमात आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्यामुळे वास्तविकपणे सत्यपणाने काम करणाऱ्याची मुस्कटदाबी करण्यातच आपले आयुष्य कसे खर्ची जाईल याचा विचार ह्या जमातीचे लोक करतात. मुळात ही जमात स्वप्नरंजनवादी असल्यामुळे नेहमीच मोठ्या झाडाच्या छायेत वावरताना दिसून येते कारण मोठ्या झाडाच्या सोबत राहिल्यामुळे आपणही मोठे झालो की काय अशी भावना या जमातीत ठासून भरत असल्यामुळे ही जमात मागे सरकत नाही ही वस्तुस्थिती आहे.त्याचमुळे मोठ्याच्या छायेत वावरताना या जमातीने अनेक महत्त्वाच्या ठिकाणच्या जागा अडवून ठेवलेल्या असतात जेणेकरून त्यांची पात्रता नसता नाही.  म्हणूनच अशा जमाती मध्ये मी पणा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मी म्हणजे सर्वस्व, मी म्हणेल ती पूर्व दिशा ही मानसिकता यांची झाल्यामुळे यांची चांडाळ चौकडी त्यांच्या तोंडावर त्यांची स्तुती नक्कीच करते पण ज्या वेळेस ही चांडाळ चौकडी ज्या वेळेस त्यांच्याकडून बाहेर निघते त्याच वेळेस ती चांडाळ चौकडी त्यांचा चांगल्याच भाषेत समाचार घेत असते ही वस्तुस्थिती या लोकांना समजत नाही, कारण चांडाळ चौकडी वर त्यांचा भरोसा असतो. मुळातच हे लोक चांडाळ चौकडीच्या कक्षेतून बाहेर येत नसल्यामुळे अशा गोष्टी होत असाव्यात, आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या चांडाळ चौकडीच्या भरोशावर कोणाचा कसा करेक्ट कार्यक्रम लावायचा याचे ज्ञान त्यांना अवगत झालेले असते आणि त्यामुळे कार्यक्रम लावण्याची सुपारी हे लोक नेहमीच घेतात आणि त्यामुळे कार्यक्रमाची लावालावी करताना त्या कार्यक्रमाची धग आपल्यापर्यंत पोहोचते की काय या  विचार प्रवाहात अडकल्यामुळे ही जमात आज मोठ्या प्रमाणात वैचारिकदृष्ट्या गोंधळलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही. 

      मुळातच आपण ज्या समाजात जगतोय त्या समाजा विषयी किती आपुलकी आहे हे सांगण्याची आवश्यकता  नसतानाही, समाजाचे आम्ही तारणहार आहोत हे दाखवण्याचा बांद्रायंनपणा याठिकाणी ही जमात मोठ्या प्रमाणात करते. त्यामुळे समाजही अशा जमातीच्या दिखाऊपणाला भुलतो आणि त्यातच त्या ठिकाणी त्या समाजाची फसगत होते ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सत्याच्यापलीकडे जाण्यासाठी आणि सत्याचा शोध घेण्यासाठी आपल्या डोळ्यांना उघडे ठेवण्याची आज आवश्यकता आज निर्माण झालेली आहे. पण ते डोळे उघडण्याच्या ऐवजी डोळे झाकण्याचे काम ही जमात मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे यांचा ना समाजाला फायदा होतो, ना ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्याला फायदा होतो, फायदा फक्त आपला कसा होईल, नफा-तोटा कुठे साधला जाईल याचा विचार करण्यातच ही जमात इतकी गुंतलेली असल्यामुळे आयुष्याच्या बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकारातच यांचे आयुष्य हे शेवटाला जाते,त्यावेळी मात्र वेळ निघून गेलेली असते कारण त्यावेळी त्यांच्याकडे ना पद असते ना सत्ता. त्यामुळे  आज या जमातीची चालती आसल्याने ही जमात सत्याचे अस्तित्व मान्य करीत नाही, त्यामुळे ही जमात कधीही एकट्याने न वावरता झुंडीत वावरताना आपल्याला दिसून येते, आणि त्याच झुंडशाहीच्या मार्गाने सत्याचे प्रमाणपत्र वाटण्यात अग्रेसर असणारी ही जमात  मी पणाचा आणि मोठेपणाचा आव आणते त्यामुळे मी पणाच्या विश्वातून सत्याला बाहेर आणने ही काळाची गरज आहे.

Saturday, July 3, 2021

वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना….

 वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना….

                 


उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो,अशा वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…. देणाऱ्यांसाठी हे दोन शब्द. वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील आपले मित्र असो वा कौटुंबिक परिवार सदस्यांचा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. कारण वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण  प्रत्येकाला  सदैव आनंददायी ठेवतात आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी प्रत्येकाच्या हृदयात सतत तेवत राहतात. यासाठीच प्रत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. त्यातूनच आपण दिलेल्या शुभेच्छांचा ती प्रिय व्यक्ती सदिच्छापणे स्वीकार करतेच पण त्या शुभेच्छाचा सदिच्छा स्वीकार करत असताना ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छाच्या दृष्टिकोनातून आपण किती कृतघ्न आहोत हे दाखवण्याचा प्रकार काल मराठवाड्यातील एका साहित्यिकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घडलेला आहे.        

         वास्तविक पाहता आज प्रत्येक क्षेत्रात काही नामवंत लोक पुढे येत आहेत आणि पुढे येताना  या क्षेत्रात आपलं नाव किती, आपला आवाका किती, आपली कुवत किती, आपली क्षमता किती याची जाण आज कोणालाही  राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे तथाकथित लोक पुढे येताना आपल्या दिसतात आणि   त्यांनाच आपण त्या क्षेत्रातील एकमेव अद्वितीय  आहोत असं वाटायला लागतं. आणि त्यातूनच छोटे-मोठे प्रकार या ठिकाणी घडताना दिसतात मग  त्यामध्ये प्रामुख्याने मान सन्मानाचा, अपमानाचा, इतरांना कमी व तुच्छ लेखण्याचा व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही या क्षेत्रातील अद्वितीय असल्यामुळे आमच्याकडून लोकांना काहीतरी हवे आहे हा अहंभाव त्यांच्या मनात ठासून भरलेला असतो. वास्तविक पाहता चूक त्या तथाकथित लोकांची नसते तर ती चूक आपली असते कारण आपणच त्यांना मोठे करतो आणि त्या तथाकथित लोकांना त्या मोठेपणाचा प्रभावाखाली आणि शाली खाली दबल्यामुळे लोकांना वाटेल तसं समजण्याची मानसिकता या तथाकथित लोकांची बनते आणि तोच प्रकार कालच्या त्या साहित्यिकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहावयास मिळाला. 

         प्रामुख्याने एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाच्या  जसा धूमधडाक्यात वाढदिवस साजरा होतो तसा त्या साहित्यिकाचा वाढदिवस हा सोशल माध्यमावर धुमधडाक्यात साजरा झाला, त्या साहित्यकाला अनेक नामवंत लोकांनी शुभेच्छा दिल्या, त्या नामवंतांच्या शुभेच्छाचा आदरपुर्वक स्वीकार केला गेला.तसेच साहित्यिकाचे नाव ऐकून अनेक हौसे, गवसे, नवशे यांनीसुद्धा त्या साहित्यिकाला शुभेच्छा दिल्या.शुभेच्छा देताना साहित्यिक आपल्या भागातला आहे, आपला मित्र आहे या अनुषंगाने त्या साहित्यिकाच्या बद्दल दोन चार जास्तीचे शब्द लिहिल्यामुळे, ते  दोन चार शब्द त्या साहित्यिकाला अतिशयोक्ती वाटली, खरं तर ती अतिशयोक्ती आहे हे साहित्यिकाला माहित असताना सुद्धा तो साहित्यिक त्या अतिशयोक्तीला उद्याचा दिशादर्शक समजतो त्यामुळे शुभेच्छाच्या महापुरात तो साहित्यिक इतका वाहून गेला की त्याला आपल्या आभार पत्रात काय लिहावं हे सुद्धा सुचलं नाही ही वास्तविकता आहे. म्हणून त्या साहित्यिकाचे आभार पत्रातील काही भाग मी जशाच्या तसा मांडतो आहे त्यात कोणतीही तोडफोड केलेली नाही, कारण साहित्यिकाने आभार पत्रात शुभेच्छा देणाऱ्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनावरून त्या साहित्यिकाची मानसिकता कोणत्या प्रकारची आहे हे आपल्या लक्षात येईल. "वाढदिवस वगैरे ही गोष्ट आपल्या कधी खीजगणतीतही नव्हती. समाज माध्यमांचा जेव्हा बोलबाला झाला तसा वाढदिवस वगैरे साजरा करण्याची टूम आम्हा खेडूत माणसांना कळू लागली. समाज माध्यमातून एकमेकांना संदेश देणे घेणे, फोन, मेसेज प्रत्यक्ष भेटीद्वारे शुभेच्छांचा सिलसिला सुरू झाला. इथपर्यंत सर्व ठीक आहे पण पुढील वाक्य आभार पत्राची दिशाच बदलते परंतु याचा उपयोग ज्या माणसाकडून खूप काही मिळवायचे आहे अशा लोकांच्या बाबतीत अधिक दिसून येतो, हे सत्य असले तरीही मात्र आपल्या सारख्या फाटक्या माणसाला वाढदिवशी स्नेहपूर्ण शुभेच्छांच्या श्रीमंतीची अनुभूती यावी यासारखी जगात दुसरी मौल्यवान गोष्ट किंमत काय असू शकते…..!

       वरील वाक्यातून शुभेच्छा देणाऱ्यांना   काय सुचवायचे ते त्या आभार पत्रातून व्यक्त होते. शुभेच्छा देणाऱ्यांना या साहित्यिकाला हेच सुचवायचे की माझ्याकडून तुम्हाला काहीतरी हवं आहे आणि त्या  लोभा पोटी तुम्ही मला शुभेच्छा देत आहात, आणि दुसऱ्याच वाक्यात आपल्याला स्वतः फाटके समजायचं, तर शुभेच्छा पत्रातील दुसऱ्या परिच्छेदातील एक वाक्य पुन्हा अधोरेखित करण्यासारखा आहे ते पुढीलप्रमाणे " मित्र मंडळींनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून केलेल्या सर्वच भावना ह्या सत्या पर्यंत पोहोचत नसल्या, प्रेमपूर्वक अतिशयोक्ती ज्यात अधिक असली तरी त्या भविष्यासाठी दिशादर्शक आहेत." म्हणजे मित्रमंडळींनी लिहिलेले दोन-चार शब्द त्यात साहित्यिकाला अतिशयोक्ती वाटतात. कारण साहित्याच्या भाषेत लिहिणारे हे मित्र त्याचेच आहेत, खरे तर कोणत्याही साहित्यिक आपलं साहित्य रसपूर्वक आणि सौंदर्यपूर्वक होण्यासाठी   दोन-चार शब्दाची  अघळपघळ करतातच म्हणजेच दुधात जास्त पाणी टाकतात. त्यालाच हा साहित्यिक अतिशयोक्ती म्हणत असेल तर आज या साहित्यिकाचे पाय जमिनीवर नाहीत असं समजायला हरकत नाहीत. खरे तर याला जबाबदार कोण आहेत तर ज्याला साहित्य क्षेत्रातील असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्च पद मिळवण्याची अघोरी भूक, त्यातून होणारी  नवसाहित्यकांची, प्रत्येक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्याची केली जाणारी मुस्कटदाबी, त्यामुळे हे नवसाहित्यिक किंवा नवीन क्षेत्रात पदार्पण करणारे कोणाच्याही वाट्याला जात नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील सुज्ञ अशा वाटमाऱ्या सहन करतात किंवा त्यांचे समर्थन करतात म्हणून  अशा लोकांना शुभेच्छा देताना आता खरंच विचार करण्याची गरज झालेली आहे. मुळातच साहित्यिकाने हे आभार पत्र ही साहित्यिकाच्या भाषेतच लिहिलेले आहे आणि मग त्या साहित्यिकाचा भाषेत शुभेच्छा देणाऱ्यांना एका शब्दात शाब्दिक मार द्यायचा आणि दुसर्‍या शब्दात त्यांना आदरपूर्वक आभार मानून कुरवाळायचे ही विसंगती या साहित्याने त्या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. म्हणूनच आज असे तथाकथित साहित्यिक स्वतःला जर मोठे आणि भाग्यविधाते समजत असतील तर अशा साहित्यिकांचे कान वेळीच टोचणे गरजेचे आहेत.वास्तविक पाहता शुभेच्छा देणाऱ्याला कोणाकडूनही कशाची अपेक्षा नसतानाही असले तथाकथित लोक  स्वतःला थोर व मोठे हे समजून घेत असतील तर अशा लोकांना शुभेच्छा देताना शुभेच्छा द्याव्यात की नाही हा महत्त्वाचा प्रश्न शुभेच्छुकां पुढे उभा राहतो, पण त्यातही खरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या साहित्यिकांने शुभेच्छुकांची जी शाब्दिक कानउघडणी केली आहे त्याला तोड नाही, त्यातून त्या साहित्यिक आणि शुभेच्छुक यांची औकात दाखवून दिली आहे. म्हणून यापुढे वाढदिवसाच्या किंवा इतर शुभेच्छा देताना शुभेच्छुकांने ही सुद्धा विचार करूनच शुभेच्छा दिल्या पाहिजे. म्हणजेच त्या साहित्यिकाचं आभार पत्र हे शुभेच्छा देणाऱ्याच्या डोळ्यात जळजळीत काजळ घालणारे आहे. म्हणूनच सदर आभार पत्राचा जर आपण गांभीर्यपूर्वक विचार केला तर आपल्याला असे म्हणता येईल की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणार्‍याचे हातही घ्यावे, असा व्यापक दृष्टीकोन ठेवणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्यकृतीला संकुचित करण्याचे काम नवीन तथाकथित साहित्यिक करत आहेत, त्यामुळे त्या साहित्यिकाचे आभार पत्र हे समझनेवाले को इशारा काफी होता है। ह्या प्रकारातील आहे. पण शुभेच्छुक किती मनावर घेतील हा ही महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ऊठसूट कोणत्याही नेत्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचे  बॅनर व होर्डिंग्स आपल्या खिशातून पैशाने लावायचे, मित्राचा वाढदिवस साजरा आपण  करायचा, आपण शुभेच्छा द्यायच्या आणि हे शुभेच्छा देणारे जर आपली औकात दाखवुन आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवत असतील तर अशा लोकांपासून आपण दूर राहिले पाहिजे, त्यामुळे इथून पुढे कोणाला जर आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असाल तर त्या शुभेच्छा ह्या विचारपूर्वकच दिल्या पाहिजेत. 










मोदीची गॅरंटी ; तरीही भाजपा समोर आव्हानच……

  मोदीची गॅरंटी ; तरीही  भाजपा समोर  आव्हानच…… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात लोकसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली असली तरीही, ...