https://www.google.com/adsense/new/u/0/pub-4475133060821869/sites/detail/url=bkilche.blogspot.com चौफेर : संशोधनासाठी यूजीसीची नवीन मार्गदर्शिका आणि संशोधन दर्जा
animated-fireworks-image-0061 animated-rose-image-0045चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे animated-rose-image-0045 मी कोणाला शिकवत नाही मी फक्त ते शिकू शकतील असे वातावरण देतो” - अल्बर्ट आईन्स्टाईन 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐💐💐💐 animated-bird-image-0155 -image-1310" />

Thursday, October 1, 2020

संशोधनासाठी यूजीसीची नवीन मार्गदर्शिका आणि संशोधन दर्जा

संशोधनासाठी यूजीसीची नवीन मार्गदर्शिका आणि संशोधन दर्जा

जागतिकीकरण,खाजगीकरण,उदारीकरणाच्या काळात भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या विषयाकडे सकारात्मकतेने पाहण्याच्या ऐवजी नकारात्मकतेने पाहिल्या जाते. कारण देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता, उपयोगिता आणि त्याचे आंतरराष्ट्रीय स्थान या सर्वाची परिस्थिती आज चिंताजनक आहे. याविषयी  सर्वच लोकांचं एकमत आहे. आज भारतीय उच्च शिक्षणामध्ये गुणात्मकतेच्याऐवजी संख्यात्मक वाढ ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. म्हणून आज नोकरी आणि पदवीचा संबंध कसा तोडता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी संशोधनाधिष्ठित, कौशल्याधिष्ठित शिक्षणाची गरज आहे.संशोधनाधिष्ठित,कौशल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या कर्तृत्वावर आपली उपजीविका भागवतील या दृष्टिकोनातून उच्च शिक्षणातील संशोधनाची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी सध्या विद्यापीठ अनुदान आयोग आपली मानसिकता बदलताना दिसते. त्यातूनच संशोधनात होणारे गैरप्रकार आणि संशोधनाचा खालावलेला दर्जा ह्याचा विचार करून यूजीसीने संशोधनाच्या संदर्भात आपली एक नवीन मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे. त्या संशोधन मार्गदर्शिकेचे स्वरूप पाहता संशोधनाची बाजू ही भक्कम करणारी आहे. पण त्यासाठी गरज आहे  ती म्हणजे ज्या प्रमाणात आपण संशोधनाची नीतिमूल्य शिकवतो त्याच पद्धतीने संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये त्या नीतिमूल्यांचा उपयोग करण्याचा, यादृष्टीने यूजीसीचे नवीन संशोधन मार्गदर्शक तत्त्वे व त्यांची भूमिका व संशोधनाचा दर्जा यावर केलेलं हे भाष्य.
   विद्यापीठ अनुदान आयोगने (यूजीसी) 29 0सप्टेंबर 2020 रोजी भारतातील शैक्षणिक संशोधनाशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केले आहेत. GOOD ACADEMIC RESEARCH PRACTICES या नावाने हा दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आले आहे. ह्या दस्तऐवजातील मार्गदर्शक सूचना  संशोधनातील संभाव्य धोके आणि सर्वोत्तम पद्धतींवर लक्ष केंद्रित करून संशोधनाचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करेल.या दस्तऐवजाची मांडणी भूषण पटवर्धन यूजीसीचे उपाध्यक्ष, आनंद देसाई, अनामिका चौरसिया, शुभाश्री नाग, राकेश भटनागर यांनी केली आहे. सदर मार्गदर्शक तत्त्वाच्या दस्तऐवजाची मांडणी ही एकून सहा प्रकरणात करण्यात आलेली आहे ती पुढीलप्रमाणे.

1.परिचय  Introduction

2.मूल्ये अंतर्निहित संशोधन अखंडता Values Underlying Research Integrity     

3.चांगल्या शैक्षणिक संशोधन पद्धतींसाठी फ्रेमवर्क Framework  for  Good  Academic  Research  Practices

3.1 संशोधन आराखडा  Research Design

3.1.1 नियोजन Planning

3.1.2 संशोधन प्रश्न आणि दस्तऐवजीकरण Research Questions and Documentation  

3.1.3 साहित्य पुनरावलोकन Literature Review

3.1.4 डेटा, संशोधन पद्धती,आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन Data, Research Methods, and Analytical Approach

3.2 संशोधन आयोजन करणे  Conducting Research

3.2.1 संशोधन अंमलबजावणी, कागदपत्रे आणि डेटा संग्रह  Research Execution, Documentation, and Data Storage

3.2.2  सशोधनातील खोटेपणा, कल्पनारम्य आणि चुकीचे वर्णन यासाठी तपासणी

Checks for Plagiarism,Falsification,Fabrication,and Misrepresentation

3.2.3 सहयोग आणि लेखक Collaboration and Authorship  

3.2.4 बौद्धिक मालमत्ता Intellectual Property

3.3 प्रसार Dissemination

3.3.1 प्रकाशनासाठी योग्य माध्यमाची निवड  Selection of the Right Medium  for Publication   

3.3.2 प्रकाशनासाठी योग्य जर्नल निवडणे  Choosing the Right Journal for Publication      

3.3.3 संशोधनाचे भाषांतर Translation of Research     

4.संस्थागत संशोधन कार्यक्रम व्यवस्थापन Institutional Research Programme Management

4.1.संशोधन अखंडता Office of Research Integrity

4.२ प्रशासन Governance

4.3 प्रशिक्षण Training

4.4. आभिरूचीतील संघर्ष  Conflict of Interest

5.पुढच्या पिढीस मार्गदर्शन करणे Mentoring the Next Generation

6. निष्कर्ष Conclusion

   एकंदरीत जीएआरपी एक व्यापक दस्तऐवज आहे कारण हे दस्तऐवज संशोधनाती प्रत्येक टप्प्यावरील संभाव्य धोके आणि चांगला संशोधन सराव यावर लक्ष केंद्रित करून संशोधनाची अखंडता वाढविण्यासाठी एक  संशोधन चौकट  तयार करते.या दस्तऐवजात संशोधनातील गैरवर्तन, बनावटपणा, खोटेपणा तपासण्यासाठी आणि संशोधनाची नैतिकता टिकवण्यासाठी शैक्षणिक संशोधनात अखंडतेच्या व गुणवत्तेच्या मापदंडांवर प्रकाश टाकला आहे.तसेच मार्गदर्शकतत्त्वामध्ये शैक्षणिक संशोधन कार्याची गुणवत्ता कसी सुधारता येईल यावर ही विविध उपाय आणि कार्यपद्धतीची माहिती  त्यात देण्यात आली आहे. नवीन मार्गदर्शकतत्त्वात संशोधन पदवी घेत असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांची भूमिका, पर्यवेक्षक, साहित्यिक चोरी, संशोधन नैतिकता ह्यावर भाष्य करण्यात आले आहे.एकदरित हा दस्तऐवज संशोधन संस्कृती आणि अखंडतेसाठी मजबूत पाया तयार करण्यात मदत करेल असा विश्वास दस्तावेज तयार करणाऱ्या तज्ञांना वाटतो.

   संशोधनातील मूल्यांवर चर्चा करताना संशोधन प्रक्रियेतील मुख्य भूमिका ही संशोधकांची असते. संशोधन ही एक गतीमान प्रक्रिया आहे, ज्यामध्ये ज्यांना काहीतरी नवीन जाणून घ्यायचं आहे  ते या प्रक्रियेत काम करतात. म्हणूनच संशोधनाचे स्वरूप हे कोणत्याही काळात एकसारखे किंवा ठराविक साचेबंद स्वरूपाचे नसते. म्हणून संशोधकाने  आपल्या संशोधनाच्या संदर्भात नैतिकता,कठोरता, प्रासंगिकता, पारदर्शकता, निष्पक्षता आणि जबाबदारी यासारख्या मूल्याचा वापर करणं गरजेचं ठरतं. कारण कोणत्याही संशोधनाची इमारत ही संशोधकाने आपल्या संशोधनात वापरलेल्या मूल्यांवरच  उभी राहते व त्या संशोधनाचे व त्या संशोधकाचे भवितव्य ठरवते ठरते.म्हणूनच संशोधन आणि मूल्य याचा परस्पर संबंध आहे.चांगल्या संशोधनाची सुरुवात सराव समस्या निवड आणि संशोधन आराखड्या पासून सुरू होते.  म्हणून आराखडा प्रस्तावित संशोधनाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचं काम करतो. म्हणूनच संशोधन आराखडा संशोधन समस्येच्या संदर्भात  एक जबाबदारी पूर्वक रूपरेषा असते. म्हणून संशोधनाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संशोधकाने कोणकोणत्या भूमिकाचा विचार करणे आवश्यक आहे याचे सविस्तर मार्गदर्शन या दस्तऐवजाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते.

  एकंदरीत संशोधन संदर्भात यासुधारणा पाहता विद्यापीठ अनुदान आयोगाला आत्ताच हा बदल का करावासा वाटतो ह्याचेही विचारमंथन होणे गरजेचे ठरते. कारण विद्यापीठीय संशोधनाचा मुद्दा हा अनेक वर्षापासून चर्चिला जातो. त्यामुळे या मुद्यांवरही प्रकाश टाकने क्रमप्राप्त ठरतं. विद्यापीठ अनुदान आयोगाने  विद्यापीठीय संशोधनाच्या संदर्भात जे काही नियम जाहीर केले आहेत ती नियमावली पाहता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांच्या विसंगत अशी  नियमावली अनेक विद्यापीठे तयार करताना  आपल्याला दिसून येतात. त्यामागची पार्श्वभूमी पाहिली तर आपल्या जवळच्या लोकांना मार्गदर्शकपदाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही नियमावली तयार केली जाते. त्यामुळे आपल्याला हवे तसे मार्गदर्शक याठिकाणी उपलब्ध होतात. वास्तविक पाहता विद्यापीठांमध्ये अनेक अपात्र मार्गदर्शक प्राध्यापकांना संशोधन मार्गदर्शकांची खिरापत वाटली जाते. त्यावर अनेक वेळा माध्यमांमध्ये चर्चा ही होत असतेच. पण अनेक विद्यापीठात राजकीय दबावापोटी व हितसंबंधापोटी विद्यापीठ प्रशासन अपात्र मार्गदर्शकांवर कोणतीही कार्यवाही न करता त्त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात.आज विद्यापीठे हे संशोधन तयार करण्याचे कारखाने झाले आहेत. कारखाना म्हटलं की भांडवलदार आले आणि भांडवलदार आले की कामगारांची लूट होते त्याचप्रमाणे याठिकाणी शैक्षणिक व्यवस्थेची लूट  करण्याचं काम  या पवित्र ठिकाणी होते. मुळातच इथली व्यवस्था ही दुसऱ्याकडे बोट दाखवणारी व्यवस्था आहे. त्यामुळे आपले कोणीही काहीही करू शकत नाही ही मानसिकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बळवली आहे. त्यामुळे  कोणत्याही विद्यापीठात शैक्षणिक काम कमी आणि राजकारण हे जास्त मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते.

   त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या संशोधनच्या गुणवत्तेचा प्रश्‍न हा नेहमीच निर्माण होतो. आज संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असताना  कॉपी-पेस्ट ही संस्कृती  संशोधनाच्या मुळाशी रुजल्या गेली आहे.म्हणून विद्यापीठीय संशोधन हे समाजहितासाठी उपयोगी नाही तर ते केवळ व्यक्तीच्या स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोगी आहे हे आपणास मान्य करावेच लागेल,कारण विद्यापीठीय संशोधनाचा संबंध हा पद आणि वेतनवाढशी आहे.विद्यापीठीय संशोधनाचा संबंध पद आणि वेतनवाढीशी संबंधित असल्यामुळेच यात अनेक गैरप्रकार होतात.यावरही विचार सुज्ञ लोकांनी करणे गरजेचे आहे. सूज्ञ लोक या गोष्टीकडे डोळेझाक करतात, हे या शिक्षण क्षेत्राचं सर्वात मोठं दुःख आहे. पण आपले काही शैक्षणिक बांधव हे प्रकरण मान्य करत नाहीत कारण ते गुणवत्तेच्या नावाखाली आमचं संशोधन हे गुणवत्तापूर्ण आहे अशी टिमकी वाजवतात, विद्यापीठामध्ये होणाऱ्या संशोधनामध्ये एक टक्का संशोधन जर सोडले तर बाकीच्या कोणत्याही संशोधनाची उपयोगिता ही शून्य आहे. म्हणून आज उच्च शिक्षणातील संशोधनाच्या संदर्भातील गुणवत्ता पाहता संशोधनाच्या माध्यमातून जे लोक या व्यवसायात  आलेले आहेत व येऊ पाहतात त्यांचा  उद्देश केवळ म्हणजेच पैसा कमावणे आहे.म्हणूनच त्यामुळे आज पीएच.डी ही शैक्षणिक पात्रता ठेऊन, नेट-सेट हा पर्याय उपलब्ध असतानाही पीएच.डीधारकाची नेमणूक संस्थाचालकांकडून केली जाते याचाही विचार करणं ही काळाची गरज आहे. 

  आज विद्यापीठीय संशोधनाच्या संदर्भात संशोधनाकडे लोकांची तुच्छ पाहण्याची जी मानसिकता झालेली आहे ती लोकांची मानसिकता कशी बदलली जाईल याचा विचार करणं ही काळाची गरज आहे. पण ह्या गोष्टीचा विचार न करता आम्हालाच सर्व काही कळतं ही भूमिका इथली मंडळी घेताना दिसतात. सोबतच आम्ही म्हणू तेच झालं पाहिजे ही मानसिकता इथल्या कारभाऱ्यांची असल्यामुळे प्रशासनास झुलवण्याचे काम इथली व्यवस्था करताना दिसते.त्यातूनच विद्यापीठ अनुदान आयोगाने संशोधनामध्ये बदल व्हावेत ह्या दृष्टीकोनातून विचार करण्यास सुरुवात केली आहे, त्या संदर्भात त्यांनी काही पावले टाकली आहेत, विद्यापीठ अनुदान आयोग संशोधन प्रक्रियेची नवी क्षेत्रे उघडताना ती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व व्यापक कशी होईल ह्यावर वेळोवेळी विचार करते त्यातुनच विद्यापीठ अनुदान आयोगाने संशोधनाच्या संदर्भात जी नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केलेली आहेत त्या मार्गदर्शक तत्त्वाचे भवितव्य इथल्या व्यवस्थेवर आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर व युजीसीवर राहणार आहे त्यामुळे या नवीन तत्त्वांचा संशोधनामध्ये उपयोग होईल का ? यासाठी वाट पाहणे गरजेचे आहे.  म्हणून संशोधनातील संभाव्य धोक्यांकडे लक्ष देण्यासाठी आणि संशोधनातील सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या शैक्षणिक संशोधनाच्या पद्धतींचे वर्णन करणारी नियमावलीचे स्वागत करणे गरजेचे ठरते. 


( फोटो: लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)


18 comments:

  1. सविस्तर विवेचन केले आहे आणि मांडणीही छान अभिनंदन

    ReplyDelete
  2. फारच छान मांडणी सर🙏🖕👌👌👌

    ReplyDelete
  3. थोडक्यात, मुद्देसूद मांडणी व छान माहिती सर

    ReplyDelete
  4. Nice directional information about research and good guidelines for our researchers

    ReplyDelete
    Replies
    1. खुपच सखोल आणि मार्मिक विवेचन केले आहे👍👍👍

      Delete
  5. खूप महत्वाची माहिती आपण दिलेली आहे thanks

    ReplyDelete
  6. डाॅ. खुप सुंदर विवेचन

    ReplyDelete
  7. तपशील उपयुक्त आहे. या गोष्टीना प्रत्यक्षात महत्व आल्याखेरीज हाही आदर्शवादी कल्पना विलासाचा आणखी एक दर्जेदार नमुना ठरेल. असो! सकारात्मक दृष्टीकोनातूनच भूमिका घेऊ. आपली सुरुवात अभिनंदनीय आहे. यासाठी धन्यवाद व आभार!

    ReplyDelete
  8. अभ्यासपूर्ण लेखन सरजी

    ReplyDelete

मोदीची गॅरंटी ; तरीही भाजपा समोर आव्हानच……

  मोदीची गॅरंटी ; तरीही  भाजपा समोर  आव्हानच…… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात लोकसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली असली तरीही, ...