नाथाभाऊची लढाई आत्मसन्मानाची का सत्तेची….
गेली काही वर्ष भाजपच्या निर्णय प्रक्रियेत आणि पक्ष कार्यात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अडगळीत पडलेले भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते,नेते व ज्यांनी तळागाळात भाजप रुजवली असे नाराज एकनाथराव खडसे हे भाजप सोडणार आणि राष्ट्रवादीत प्रवेश करणार ह्या अनेक दिवसाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळत आहे. कारण त्यांनी स्वतः भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे व मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे हे अधिकृतपणे जाहीर केलेले आहे. एकंदरीतच एकनाथ खडसे यांचे आणि भाजपचे संबंध बघितले तर गेल्या 40 वर्षांपासून ते भाजपामध्ये काम करत होते. एकेकाळी भाजपा हा शेटजी भटजीचा पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्यामुळे या पक्षाचं अस्तित्व हे फक्त काही मोजक्या भागापुरता शहरी भागापुरता मर्यादित होतं. सुरवातीच्या काळात प्रमोद महाजन यांचे मेहुणे गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला बहुजना पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर, सूर्यभान पाटील, ना.स फरांदे, उत्तमराव पाटील असे अनेक बहुजन पिढीतील नेते पुढे आले. म्हणजेच भाजपचा प्रवास स्पृश्यतेकडून अस्पृश्यतापर्यंत पोचवण्याचे काम या लोकांनी केलं हे वास्तव आहे. एकंदरीतच भाजपाला महाराष्ट्रात व ग्रामीण भागात चेहरा मिळवून देण्याचे काम या बहुजन नेतृत्वाने केलं हे ही आपल्याला मान्य करावं लागतं. मुळातच जुना भाजप आणि आजचा नवीन भाजप यांच्या धोरणांमध्ये आणि व्यावहारिकतेमध्ये मोठा फरक आहे. जुन्या भाजप मध्ये शब्दाला आणि माणसाला महत्त्व होतं.आताच्या नवीन भाजपमध्ये शब्दाला आणि माणसाला किंमत नाही तर लोकशाहीत डोके मोजण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीचा विस्तार करून संख्येला आज भाजप महत्त्व देतोय. त्यामुळे संख्येच्या आधारावर विस्तारवादाची भूमिका आज भाजपने स्वीकारली आहे. ह्या विस्तारवादी धोरणामुळे आज भाजप आपल्या पडतीच्या काळात साथ देणाऱ्या महत्त्वाच्या पक्षांच्या ही मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच मुळातच ज्यांनी भाजपाचे बी रोपण केलं,आणि त्या बियाणाचे ज्यावेळी झाड झाले, त्याचवेळी झाडाच्या जुन्या फांद्या आपोआपच कशा गळून पडतील याचा विचार भाजपाच्या नवं नेतृत्वाने केला आणि त्यातच आज भाजपामधली जुनी जाणकार पिढी आपोआप गळून पडल्यासारखी दिसून येते.त्याला महाराष्ट्रातील एकनाथ खडसे ही अपवाद नाहीत हे आपल्याला यावेळी म्हणावं लागेल.
एकंदरीतच नाथाभाऊच्या कारकिर्दीबदल बोलताना वयाची चाळीस वर्षे एखादी सेवा म्हणजे एक दिव्यच असते !.. शासकीय सेवेत तर हे दुरापास्तच ! एखाद्या व्यक्तीने एवढी सेवा केली म्हणजे तो सन्मानाने 'निवृत्त' होतो. मात्र भारतीय राजकारणात एवढ्या सेवेनंतर धुमारे फुटतात ते नेत्यांच्या प्रतिभेला व कर्तृत्वाला आणि हो सेवावृत्तीलाही ! एवढ्या प्रदीर्घ अनुभवानंतर एखाद्या नेत्याला आपला मार्ग, विचार व आचार सगळंच चुकल्याची उपरती होते हाच एक भारतीय राजकारणातील चमत्कारच म्हणायचा की भारतीय लोकशाहीचा आणि एकंदरीत समाजाच्या मानसिकतेचा विषय मानायचा हाच प्रश्न आज सर्वाच्या पुढे उभा राहतो ! त्यातूनच केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुरब्बी व चाणाक्ष नेते एकनाथराव खडसे उर्फ भाऊ यांना असाच साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपली संघर्ष, हिंदुत्ववादी व विरोधी भूमिका बदलून, सत्तेच्या राष्ट्रवादाचे नवे पर्व अंगिकारले, त्या विचारांना जवळ केले व आपला मार्ग बदलला आहे.
आयुष्यभर विरोध केलेल्या विचारधारेचा चाळीस वर्षानंतर अंगिकार म्हणजेच एक चमत्कारच, नाही का? या महानुभावी नेत्यांची कृती म्हणजे जनसामान्यांना पडलेलं कोडंच म्हणावे लागेल! ज्याचा साधक बाधक विचार करून तो स्वतःचे केस पिकवून घेतो तो कार्यकर्ता, त्या नेत्यांमागे अक्षरशः धावतो, ऊर फुटेपर्यंत ! मात्र त्याला मोबदल्यात मिळते काय?तर निराशा आणि ताण ! यानिमित्ताने सामान्य माणसाला पडणारे काही सामान्य प्रश्न आहेत. नाथाभाऊंना त्यांच्या पूर्वीच्या पक्षाने काय कमी दिलं जे नवीन पक्षात त्यांना मिळेल? कालपर्यंत त्यांच्यासाठी डोकेफोड केलेल्या कार्यकर्त्यांनी आता उद्यापासून कोणती भूमिका घ्यावी? त्यांना विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांची तळी का व कशी उचलावी? त्यांच्या व यांच्या हे नवीन बदल कसे अंगवळणी पडतील?... या सर्व प्रश्नांची उत्तरे नेते व कार्यकर्त्यांना यथावकाश मिळतीलच ! मात्र येथे मूलभूत व कळीचा तात्कालिक प्रश्न म्हणजे साक्षात नाथाभाऊंचे भवितव्य काय?
समजा, आज नाथाभाऊ नवीन पक्षात गेले आणि त्यांची मनीषा सुफळ झाली तरी तिचा कालावधी किती वर्षे, महिने असेल? आज नाथाभाऊ ज्या सत्तेच्या आश्रयाला जातात त्या सत्तेचे स्वरूपच मुळात तीन महत्वाकांक्षी पक्षांचे आहे, त्याचे नाव आहे 'विकास आघाडी ! ज्यांच्यात कायम कुतरओढ असते मला किती यासाठी ! ते ज्या 'राष्ट्रवादी' पक्षात गेले 'भारतीय' सोडून त्यावर त्यांनी किती आणि किती दिवस विश्वास ठेवावा हा त्यांच्या श्रध्देचा प्रश्न असला तरी त्याचा दूरगामी परिणाम त्यांच्याच भवितव्यावर पडणार आहे!आपल्या मूळ पक्षाच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला शिव्या देऊन देऊन, सत्तेच्या किल्ल्या फिरवून फिरवून समजा उद्या त्या नवीन पक्षाने त्यांच्या समवेत अजून काही आमदारांना पक्षात घेऊन राजकीय उलथापालथ केली, सेनेपेक्षा अधिक पाठबळ प्राप्त करून सत्ताही काबीज केली,व नाथाभाऊंना तथाकथित पद, प्रतिष्ठा व पतही मिळाली तरी तिचा कालावधी किती असेल? पाच वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीयत्व उफाळून आले, थोरल्या साहेबांना राष्ट्रपती पदाची ऑफर आली किंवा चार वर्षानंतर पुन्हा भारतीय जनता पक्ष सत्तास्थानी आला तर नाथाभाऊ, त्यांचे विचार व त्यांचे भविष्य काय? मग त्यांनी अशावेळी काय आणि कसे करावे?... आणि कार्यकर्त्यांनी ! हा येणारा काळच सांगेल.
एकंदरीतच नाथाभाऊच्या विजवनवासाची सुरुवात झाली ती बहुजनाचा मुख्यमंत्री असावा ह्या वाक्याने आणि त्याला मूर्तरूप आले ते भ्रष्टाचाराच्या आरोपांनी. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुजनांची आपण प्रासंगिकता पहिली तर असे निदर्शनास येते की बहुजन हे लढण्यासाठी असतात, त्यामुळे बहुजनांनी केवळ लढावं आणि ज्यावेळी निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी बहुजनांना यायचं असतं त्यावेळी बहुजनांना डावलून निर्णय प्रक्रिया उच्च जातीच्या हाती जाते हे वास्तव आहे.तोपर्यंत बहुजनांसाठी जी काही छोटी-मोठी पद असतात ती पद बहुजन भोगतो तोपर्यंत त्याला बहुजनाची व्याख्याही करता येत नाही, बहुजन म्हणजे काय हे ही सांगता येत नाही, पण ज्या वेळी त्याच्यावर अन्याय होतो त्यावेळी तो बहुजनाचा चेहरा पुढे करतो हे ही तेवढंच खरं आहे म्हणून आज राजकारणातील बहुजन कोणाला म्हणायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न डोळ्यासमोर येतो.
नाथाभाऊच्या एककल्ली व स्पष्टवक्तेपणामुळे आज नाथाभाऊ चाळीस वर्षाची सेवा देऊन दुसऱ्या पक्षात चालले त्यावेळी जुन्या पक्षातून जाताना जुन्या पक्षातील संबंध व नव्या पक्षात जाताना नव्या वातावरणाशी जुळवून घेणे याची कसरत नाथाभाऊला करावी लागेल पण ही कसरत करत असताना आज नाथाभाऊकडे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी म्हणजे वय ही गोष्ट त्यांच्या सोबत नाही ही वस्तुस्थिती आहे. एकंदरीतच नाथाभाऊची राज्यातील ताकद व क्षमता पाहता नाथाभाऊंनी पक्ष सोडण्याच्या ऐवजी त्याच पक्षात राहून जर संघर्ष केला असता तर त्या संघर्षाला चार चाँद लागले असते. पण नाथा भाऊंना पक्षात असाहय झाल्यामुळे पक्ष सोडावा लागला ही वस्तुस्थिती आहे. नाथाभाऊंनी पक्षात असतानासुद्धा ज्यावेळी अडगळीत पडले त्यावेळी सुद्धा जळगाव महानगरपालिकेच्या संदर्भात काही वेगळ्या भूमिका घेतल्या होत्या त्या भूमिका पाहता ते यशस्वीपणे पेलू शकले नाहीत ही एक स्थानिक राजकारणाची बाब आपल्यासमोर येते. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये नाथाभाऊच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या संदर्भात आपल्याला एवढेच म्हणता येईल की आज नाथाभाऊ सारखे जुनेजाणते लोक पक्ष का सोडत आहेत याचे ही आत्मपरिक्षण भाजपनं करणे गरजेचे आहे.कारण पक्ष सोडताना एकनाथ खडसेंच्या आरोपांमुळे देवेंद्र फडवीसांच्या प्रतिमेसोबतच भाजप पक्षालासुद्धा धक्का बसणार आहे ही वस्तुस्थिती आहे.म्हणून हा नाथाभाऊचा लढा आत्मसन्मानाचा का सत्तेचा आहे तो येणारा काळच सांगु शकेल.पण एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती आणि होणारे पक्षांतरे पाहता महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेने पर्यंत ह्या प्रकरणाची झळ जाऊ शकते याचाही विचार महाआघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी आज करणं गरजेचं आहे.
( फोटो: लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)









वास्तुनिष्ठतेकडे जाणारे विश्लेषण !
ReplyDeleteIt's real fact
Deleteसर खूपच छान नाथाभाऊ च्या निर्णयावर आपण येता योग्य व सर्वांगीण विचार मांडले परंतु परिस्थितीच अशी आहे की जिथे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो स्वाभिमानी रक्ताला तिथे थांबणे शक्य होत नाही तेथे नफा-तोटा याचा फायद्याचा विचार अजिबातच राहत नाही मूळ परिस्थितीतून मुक्त होणे हा एक सक्षम पर्याय उभा असतो आणि नाथा भाऊंनी तेच केलंय राहिला प्रश्न राहिला प्रश्न अस्तित्वाचा तर ज्यांच्याकडे कॉलिटी आहे ते कधीच संपत नसतात हा निसर्गाचा नियम आहे धन्यवाद
Deleteछान लिखाण केलंय सर...💐💐
Deleteधन्यवाद👏👏👏
Deleteया लेखात लेखकच जाती पातीत अडकलेला दिसतोय आणि हो बहुजन हा देखील खूप मोठी उंची फक्त भाजपा मध्येच गाठू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे मोदीजी
Deleteधन्यवाद...👏👏👏
DeleteChhan
ReplyDeleteधन्यवाद👏👏👏
Deleteवास्तव विवेचन
ReplyDeleteखूप छान लेख आहे.अभ्यास पूर्ण आणि समर्पक लेख आहे.भाषा मांडणी प्रगल्भ आहे. असेच लेखन सुरू ठेवा.शुभेच्या!!💐💐
ReplyDeleteधन्यवाद👏👏👏
Deleteखूप छान विश्लेषण सर
ReplyDeleteनाथाभाऊ चुकीचे वागले असे वाटत नाही. युती शासनातील किमान पाच ओबीसी भाजप मंत्र्यांची नावे सांगा.शिवसेनेला धोका नाही. मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला.आता भाजपला कोंग्रेस मधुन आलेले लोकप्रतिनिधी सांभाळत बसावं लागेल. फडणवीस यांनी कोणते बहुजन मोठे केले? काही मंत्री पदं मागास समाजाला देणं गरजेचं आहे म्हणून दिली जातात मना पासून देत असतील असं वाटतं का?
ReplyDeleteधन्यवाद👏👏👏
Deleteखूप छान सर
ReplyDeleteNice analysis...
ReplyDeleteधन्यवाद👏👏👏
Deleteअगदी बरोबर आहे सर.... अगोदर ओबीसी समाजाला बरोबर घ्यायचे आणि नंतर सत्ता आली की सोडून द्यायचे हे राजकारणात अनेक पक्षांनी केलेले आहे त्यात भाजपही आहे.
ReplyDeleteधन्यवाद👏👏👏
DeleteSelf respect is important
ReplyDeleteThanks Sir 👏👏👏
Deleteएकदम छान मांडणी डॉ
ReplyDeleteधन्यवाद सर 👏👏👏
Deleteखूप योग्य लिहिले आहे व आपण सत्यता मांडली आहे
ReplyDeleteपण माझ व्यक्तीगत मत असे आहे की पक्ष कोणताही असो त्या मध्ये व नेत्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते व काम करत असताना आपसात विरोध होतो पण खडसे साहेबांची विचार धारा व राष्ट्रवादी ची विचार धारा या मध्ये मला तरी वाटत नाही लवकर जमल भाजपा हि हिन्दुत्वाचे जास्त गुण गाण करते व तसे नेते मंडळी पण विचार करते असो नाथाभाऊ मुरबी नेते आहेत पण आपल्या लिखाणातून समाधान झाले खुप खुप शुभेच्छा
This is really remarkable editorial sir , after reading this article I have understood too much about state politics.So sir you should write continuously .I am waiting for the next treasure of knowledge.
ReplyDeleteThanks..👏👏👏
ReplyDeleteआत्मसन्मानाचा विचार केल्याने नाथाभाऊंना सहा वर्ष लागली, नसता मागच्या विधानसभा निवडणुकीत पक्ष प्रवेश केला असता. असो अगदी महत्वपुर्ण लेख.
ReplyDeleteधन्यवाद..👏👏👏👏
Deleteखुपच छान मांडणी केली आहे सर
ReplyDeleteधन्यवाद...👏👏👏
Deleteसर छान लिखाणाबद्दल हार्दिक अभिनंदन. नाथाभाऊंचा लढा आत्मसन्मानाचा आहे, हेच यातून सिद्ध होते. पक्षात होणारी घुसमट आणि त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी चाळीस वर्ष पक्षात राहणाऱ्या व्यक्तीने आत्मसन्मानासाठी वेगळा मार्ग निवडणे यात गैर काहीच नाही. त्यामुळे नाथाभाऊ यांनी सत्तेपेक्षा आत्मसन्मानाचा लढा जिंकला, असेच म्हणावे लागेल... पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा...
Deleteजे मांडलं ते योग्य मांडलं...नाथाभाऊनी त्याच पक्षात राहून संघर्ष करायला हवा.....नक्की यश मिळालं असत....मला मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे....त्यांना यश मिळालं असत....
ReplyDeleteधन्यवाद👏👏👏
Delete