https://www.google.com/adsense/new/u/0/pub-4475133060821869/sites/detail/url=bkilche.blogspot.com चौफेर : हिंदुत्वाच्या मालकी हक्कातून गुलामगिरीकडे वाटचाल...
animated-fireworks-image-0061 animated-rose-image-0045चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे animated-rose-image-0045 मी कोणाला शिकवत नाही मी फक्त ते शिकू शकतील असे वातावरण देतो” - अल्बर्ट आईन्स्टाईन 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐💐💐💐 animated-bird-image-0155 -image-1310" />

Sunday, November 1, 2020

हिंदुत्वाच्या मालकी हक्कातून गुलामगिरीकडे वाटचाल...

हिंदुत्वाच्या मालकी हक्कातून गुलामगिरीकडे वाटचाल...


हिंदुत्व हा भारतीय राजकारणातील कळीचा मुद्दा आहे. आणि त्या कळीच्या मुद्द्यालाच वेळोवेळी फुंकर घालून मशाल कशी पेटती राहील  व त्यावर आपली राजकीय पोळी  कशी भाजली जाईल हाच विचार भारतीय राजकीय व्यवस्थेत होताना दिसतोय. त्यातूनच आज भारतावर हिंदुत्व लादण्याची आणि त्या हिंदुत्वाचे मालक होण्याची मोठी स्पर्धा सध्या देशात सुरू आहे. त्यातूनच जो तो म्हणतो की कोणीही आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. एकंदरीतच हिंदुत्वाच्या नावाखाली कोणाला राजकीय सत्ता मिळणार!पण सर्वसामान्यांना काय मिळणार?हिंदुत्वाच्या नावाखाली चाललय काय? याचा घेतलेला हा मागोवा.

    मुळातच हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनकत्व हे सावरकरांकडे जाते. परंतु आज हिंदुत्वाच्या विचारसरणीवर मुळात मालकी हक्क हा संघाच्या नावावर जाताना दिसतो. नागपुरात डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी हिंदुधर्माच्या रक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुसंघटनेची स्थापना केली. त्या संघटनेला जी तात्त्विक पायाची गरज होती ती गरज सावरकरांनी पुरवली ही वस्तुस्थिती आहे.परंतु मुळातच सावरकरांचे विचार हे आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहला प्रोत्साहन देणारे राहिल्यामुळे सावरकरांचे हे विचार सनातनी लोकांना पटणे शक्‍यच नव्हते. त्यामुळे सावरकर हिंदुत्ववादी असूनही पुरेसे अनुयायी मिळू शकले नाहीत. तसेच काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीत सावरकरांचे नाव ही नव्हते.(उत्तरा सहस्रबुद्धे ; सावरकर ‘क्रांतिकारक’ होते, ‘दहशतवादी’ नव्हे!)

    आज आपल्याकडे ऐतिहासिक पूर्वग्रह आणि इतिहासाचे चुकीचे अर्थ सांगून पूर्वग्रहदूषित कल्पनांच्या आधारे राष्ट्राच्या मूळ संकल्पनेला बाधा आणली जात आहे. ‘राज्य‘, ‘राष्ट्र‘ या संकल्पना, तसेच ‘संस्कृती‘ (Culture), या संकल्पनेबद्दल, आज चुकीच्या व वेगवेगळ्या संकल्पना सांगितल्या जातात.आणि त्यातूनच राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आज कोणालाही राष्ट्रद्रोही ठरवल्या जात आहे ही वस्तुस्थिती आहे.त्यातूनच आज राज्य, राष्ट्र, संस्कृती ह्या संकल्पना  देशाच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू ठरू लागल्या आहेत. त्यातून राष्ट्र प्रथम, व्यक्ती नंतर ही संकल्पना आज देशात मोठ्या प्रमाणात रुजवली जात आहे. मुळात राष्ट्र प्रथम ह्या संकल्पनेच्या आड लपून, राष्ट्रवादाची भावना या ठिकाणी प्रखर केली जात आहे. कारण मुळातच राष्ट्र प्रथम, राष्ट्रवाद, राष्ट्राभिमान ह्या संकल्पनेच्या व्यवहार आणि कृती यामध्ये मोठी फारकत या ठिकाणी करून आज देशात हिंदुत्वाचे राजकारण मोठ्याप्रमाणात जोर धरू लागले आहे. त्यातूनच आज देशाची राजकीय विभागणी ‘भाजप वि. भाजपेतर‘ म्हणजेच ‘हिंदुत्ववादी वि. सेक्युलर‘, असी  झालेली आहे.

मुळातच हिंदुत्वाकडे जाताना हिंदू संघटनांसाठी अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेचे समूळ उच्चाटन केले पाहिजे हा सावरकरांचा विचार, तर गुरुजीप्रणीत संघाचा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर विश्वास.गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे, असे म्हणणारे सावरकर आणि आजचा भाजप ह्याची जर तुलना केली तर भारतीय जनता पक्षाचे आजचे हिंदुत्व देव देऊळ, मंदिर, पूजा-अर्चा,गोमातेच्या, भोवती फिरते ही वस्तुस्थिती आहे. आज देशात गोमातेवरून हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होतोय. एकंदरीतच सावरकर गाईला हिंदुत्वाचे प्रतीक मानायला तयार नव्हते. गाय हा एक उपयुक्त पशू पिंवा प्राणी आहे हेच स्पष्ट मत असताना ही आजच्या हिंदुत्वाच्या केंद्रस्थानी गाय हा विषय मुख्य ठरतो. म्हणूनच  ‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्वाच्या संदर्भात विचारून,हिंदुत्व संदर्भातील दुटप्पी भूमिका राजकारणासाठी कशी वापरली जाते यावरून भाजपला टिकेचे लक्ष्य केलं आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वा संदर्भातील भूमिकेच्या संदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांचे दाखले दिले आहेत.

    मोहन भागवत यांनी आपल्या दसऱ्याच्या भाषणात हिंदुत्व शब्दावर भर देऊन हिंदुत्वाची संकल्पना कोणत्या पद्धतीची आहे ह्यावर भाष्य केलं. ते म्हणतात,"हिंदुत्व या शब्दाच्या अर्थाला पूजा-अर्चेशी जोडून संकुचित करण्यात आलं आहे. हा शब्द आपल्या देशाची ओळख आहे. हा शब्द आपल्या परंपरेचा भाग आहे. हिंदू कोणत्याही एका संप्रदायाचं नाव नाही. कोणत्याही एका प्रांतात जन्म झालेला हा शब्द नाही. ही कुणाची जहागीर नाही. किंवा कोणत्याही एका भाषेचा पुरस्कार करणारा हा शब्द नाही. आपण भारत एक हिंदू-राष्ट्र आहे, असं म्हणतो, त्यावेळी त्याची संकल्पना राजकीय नाही. हिंदूं शिवाय इतर कुणीच राहणार नाहीत, असा याचा अर्थ ही नाही. हिंदू या शब्दात सर्वजण समाविष्ट आहेत.हिंदू शब्दाच्या परिघात येण्यासाठी कुणालाही आपली पूजा-पद्धत, प्रांत किंवा भाषा यांसारखी विशेषता सोडावी लागत नाही. पण फक्त आपलंच वर्चस्व असावं, ही इच्छा सोडावी लागते.आपली छोटीशी ओळखसुद्धा ही आपली विविधतेत असते. काहीजण इथे आधीपासून होते. काही जण यामध्ये बाहेरून येऊन सामील झालेले आहेत, हिंदू विचारात अशाच विविधतेचा स्वीकार आणि सन्मान आहे. पण या विविधतेलाच काही लोक फरक समजतात." मोहन भागवत यांचे हिंदुत्वावरील व्यापकत्व हे संघाच्या दृष्टीने किती व्यापक आणि महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण एकंदरीतच हिंदुत्वाच्या संदर्भात आणि संघाच्या कृती आणि व्यवहाराच्या संदर्भात एक बोलल्या जाते आणि दुसरं केल्या जाते  ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मोहन भागवत यांच्या विधानांवर किती विश्वास ठेवावा हा एक संशोधनाचा विषय ठरतो.

    हिंदुत्वा संदर्भात बाळासाहेब ठाकरेची भूमिका पाहता ते म्हणतात की, माझं हिंदुत्व फक्त घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही. घंटा वाजवली म्हणजे हिंदुत्व, शेंडी आणि जानवं घातलं म्हणजे हिंदुत्व नाही. ह्याच विचाराला उद्धव ठाकरेंनी हात घालून हिंदुत्वावरील आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवरून भाजपनेही त्यांच्यावर हिंदुत्वा वरून टीका केलेली आहे.

   एकंदरीतच मुळात हिंदुत्वाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर हिंदुत्व ही संकल्पना कोणत्या पद्धतीने मांडली आहे? तीचे स्वरूप काय आहे? ह्या गोष्टीचा विचार केल्यास तर मूळ हिंदुत्वाच्या ह्या संकल्पनेला बायपास करून हिंदुत्वाची नवहिंदुत्ववादी संकुचित संकल्पना जी की पूजा आर्चाशी,गायीशी, देव देवळांशी,  राम मंदिरांशी खानपानाशी, लव्ह जिहादाशी बांधली जाणारी आहे. त्यामुळे आज हिंदुत्व हे केवळ धार्मिक नाही तर तो एक भारतीय राजकारणाचा व्यवहारिक राजकीय सिद्धांत बनू पाहतोय. म्हणूनच आज आरएसएस,विश्व हिंदू परिषद, भाजपा-शिवसेना, आणि धार्मिक संघटना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हिंदुत्वाचे विषय पुढे घेऊन जाताना त्यावर आपला मालकी हक्क दाखवताना दिसतोय. कारण सुब्रमण्यन स्वामी सारखे भारतीय जनता पक्षाचे नेते असे म्हणतात की, भारतीय जनता पार्टी भारताला हिंदू राष्ट्र बनवणार नाही. कारण संविधान त्यांना तशी मान्यता देणार नाही.पण हे होतानाच जोपर्यंत भाजप हिंदुत्वाची विचारधारा सोडत नाही तोपर्यंत भाजप सत्ताधारी राहील असं विधान करून हिंदुत्व हे राजकीय सत्तेचा प्राण आहे हेच हे याठिकाणी सांगताना दिसतात.

     एकंदरीतच मुळात हिंदुत्वाचा विचार करता हिंदुत्ववादी विचाराला ही भारतीय संविधान हे मान्य करावं लागतं हे रडतपडत का होईना हे सुब्रमण्यन स्वामी सारखे राजकारणी मान्य करतात. पण भाजपमधील काही सत्ताधारी लोक हे तत्त्व मान्य करत नाहीत. म्हणूनच अधिकार पदावर असणारे लोकसुद्धा संविधानाची शपथ घेणाऱ्यांना असं विचारतात की तुम्ही धर्मनिरपेक्ष कधीपासून झालात? म्हणजेच संविधानाच्या संदर्भातील भारतीय जनता पक्षाची भूमिका ही दुटप्पी स्वरूपाची आहे हे या विधानांने सिद्ध होते. आज संविधानाचे  राज्य असताना हिंदुत्वाचे राज्य  रेटण्यासाठी उच्चनीचतेची, भेदाभेदाची, अहंकाराची, पूजा आर्चेची, राम मंदिराची शिकवण हिंदुत्वाच्या नावाखाली दिली जाते, आणि त्यातूनच आज हिंदुत्वाचा आसरा घेणाऱ्यांना मानसिक गुलाम करण्याचं काम हिंदुत्वाच्या नावाखाली या ठिकाणची राजकीय विचारधारा करते हे ही आपल्याला मान्य करावं लागतं. त्यामुळे आज हिंदुत्वाच्या संकुचित संकल्पनेच्या आधारावर जातिव्यवस्थेचे मूळ उपटून टाकण्याच्या ऐवजी जातीय व्यवस्था किती आवश्यक आहे ही मानसिकता या समाजात रुजविण्याचे काम राजकीय धुरीण करताना दिसून येतात.त्यामुळे जातीव्यवस्थेचे समूळ जोपर्यंत या समाजातून जाणार नाही तोपर्यंत या ठिकाणांचे राजकीय नेतृत्व आपल्या संपूर्ण समाजाला मानसिक गुलाम बनवणार हे ही वास्तव आहे. आणि जोपर्यंत आपण सामाजिक, मानसिक गुलाम आहोत तोपर्यंत आपल्याला पूजाअर्चा,धर्म,मंदिर, जातीय व्यवस्था यात अडकवल्या जाणार हे ही निश्चित आहे. त्यामुळे आज सामाजिक परिवर्तन जर करायचं असेल तर प्रत्येकाने संविधानाचा योग्य वापर करणं गरजेचं ठरतं.कारण  संविधानात प्रत्येकांने धर्माचे पालणं कसे करावे ह्याचे सविस्तर विवेचन केलेले आहे.त्यामुळे आज हिंदुत्वाच्या नावाखाली ध्रुवीकरण न करता संविधानाच्या विचारांचे ध्रुवीकरण आपल्या डोक्यात जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या देशात सामाजिक परिवर्तन होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज हिंदुत्वाच्या विचारावर कोणीही कितीही मालकी हक्क सांगत असलं तरी त्या हिंदुत्वाच्या मालकीचा वारसा आपण किती जपायचा हे ज्याचे त्याच्यावर येऊन पडते. त्यामुळे हिंदुत्वावर मालकी केवळ राजकीय सत्तेसाठी आहे हेच या हिंदुत्वाच्या मालकत्वातून सिद्ध होतं. त्यामुळे हिंदुत्वाच्या नावाखाली केवळ आपलं राजकीय अस्तित्व आणि जातीय अस्तित्व कायम राखण्याचं काम या ठिकाणी होतं. त्यामुळे अगोदर राष्ट्रप्रेम आणि नंतर व्यक्ती ह्या विधानाच्या संदर्भात आपल्याला आता विचार करणे गरजेचे आहे कारण राष्ट्र प्रेमाच्या नावाखाली आपलं अस्तित्व कसे टिकवता येईल याचाच विचार या ठिकाणी केला जातोय, म्हणून हिंदुत्व हे एकमेकांना जोडण्याचं काम नाही तर तोडण्याचं काम आहे. त्यामुळे हिंदुत्वावर मालकी हक्क सांगताना आपण लोकांना कुठेतरी बांधतोय,लोकांचे स्वातंत्र्य धोक्यात आणतोय, ह्याचा विचार हिंदुत्वाच्या मालकी हक्कवाल्यांनी करावा. त्यामुळे प्रत्येकाने आज वेळीच जागे होणे गरजेचे ठरते. कारण ज्याप्रमाणे इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनुन भारत देशाला गुलाम बनवले त्याच पद्धतीने आज आपल्यालासुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली एकत्र आणून मानसिक गुलाम करण्याचं काम या ठिकाणी होत आहे हे मात्र नक्की. एक वेळ राष्ट्रप्रेमाखाली आपण इंग्रजांचा विरोध करू शकलो पण मानसिक गुलामगिरीतून आपण कोणाचाही विरोध करू शकणार नाही, कारण मानसिक गुलामगिरीतूनच आज अंधभक्त, गुलाम ही उपमा देण्याचं काम या राजकीय संस्कृती सुरू आहे. त्यामुळे येणारा काळ हा कसा असेल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोणत्याही वादात न अडकता संविधानात आडकलेलं कधीही बरं राहील, कारण संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय याची शाश्वती देते,आणि ह्याच विचारावर आपण कधीही कोणाचा मानसिक गुलाम बनू शकत नाही, हे वास्तव आहे.


( फोटो: लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)
























19 comments:

  1. सर! आपण खूप छान व अत्यंत वास्तवदर्शी लिखाण या ब्लॉगद्वारे केले आहे. अभिनंदन सर

    ReplyDelete
  2. आपल्या मध्ये सर एक उत्कृष्ट संपादक दडला आहे।

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद
      एवढ्या मोठ्या पदावर पाठवू नका सध्या 👏👏👏

      Delete
  3. छान विश्लेषण सर

    ReplyDelete
  4. सर आपण खूप चांगल्या पद्धतीचे लिखाण केलेले आहे मनापासून आपले अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. हिंदू धर्म व हिंदू याविषयी खूप छान माहिती आपण सादर केली

      धन्यवाद सर

      Delete
  5. सर लेखाची मांडणी खप छान केलेली आहे आणि वास्तव तेवर प्रकाश टाकला आहे सर

    ReplyDelete
  6. डाॅ अत्यंत वास्तव विश्लेषण /समीक्षण, महाराष्ट्र एका निष्पक्ष समीक्षकाच्या स्वागतासाठी आसुसलेला आहे, ते कदाचित तुमच्या रूपाने पूर्ण होईल.

    ReplyDelete
  7. छान सर... आपल्यामध्ये लिखाणाची लयबद्धता येत आहे..

    ReplyDelete
  8. सर प्रथमतः आपले अभिनंदन... सर हिंदुत्व हा विषय खूप दूरपर्यंत पसरलेला शब्द आहे.... नव्हे ती एक विचारसरणी, जीवनप्रणाली आहे हिंदुत्व ही विशिष्ट .... समाजाची,धर्माची मक्तेदारी नाही. काही हिंदुत्वाचा उघड पुरस्कार करून सत्ता मिळवतात तर काही.....असो सर आपण खूप छान लाख लिहला मला तो आवडला....very nice.....👌👌

    ReplyDelete
  9. फारच विश्लेशन करून सत्य परिस्थिती दाखवून दिलं आहे
    मला गर्व आहे आपण ही एकाच गावातले राहणार आहोत
    धन्यवाद सर

    ReplyDelete
  10. खूप छान विश्लेषण.हिंदूत्वाच्या मुद्याया केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच आतपर्यंत राजकारण्यांकडून वापर झाला आहे.सदर लेख वाचून सामान्य माणसांचे जनमत योग्य दिशेने सकारात्मक घडण्यास मदत होईल.

    ReplyDelete

मोदीची गॅरंटी ; तरीही भाजपा समोर आव्हानच……

  मोदीची गॅरंटी ; तरीही  भाजपा समोर  आव्हानच…… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात लोकसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली असली तरीही, ...